मद्यपी चालकाची पोलिस हवालदाराला धडक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नागपूर : 'ड्रंक अँड डाईव्ह' मोहिम राबवित असताना एका मद्यपी वाहनचालकाने पोलिस हवालदाराला जबर धडक दिली. या धडकेत पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. ही घटना सोनेगाव हद्दीत मिहान उड्डाण पुलाजवळ घडली. 

नागपूर : 'ड्रंक अँड डाईव्ह' मोहिम राबवित असताना एका मद्यपी वाहनचालकाने पोलिस हवालदाराला जबर धडक दिली. या धडकेत पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. ही घटना सोनेगाव हद्दीत मिहान उड्डाण पुलाजवळ घडली. 

रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सोनेगाव पोलिस ठाण्याचे हवालदार हेमराज, शिपाई सचिन, विक्रम आणि नरेंद्र यादव हे मिहान उड्डाण पुलाजवळ ड्रंक ऍण्ड डाईव्हची कारवाई करीत होते. त्यावेळी केतन किशोर झाडे (26, खापरी) हा त्याच्या (एमएच 40 एडी 6482) क्रमांकाच्या मोटरसायकलने आला. हवालदार हेमराज यांनी केतनला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने हेमराज यांना धडक दिली. त्यामुळे हेमराज आणि केतन दोघेही खाली पडले. त्यानंतर केतन हा शिपाई नरेंद्र यांच्या अंगावर गेला आणि "तुम्ही माझ्यावर काय कारवाई करता मी तुम्हाला पाहून घेईन' अशी धमकी दिली.

पोलिसांनी ब्रिथ ऍनॉलॉयझरच्या मदतीने त्याची तपासणी केली असता तो दारू प्यालेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हवालदार हेमराज यांच्या पायाला मार लागल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी केतन झाडे यास अटक केली.

Web Title: The drunken driver rush two wheeler on police constable

टॅग्स