file photo
file photo

एका रात्री भाऊ आला दारू पिऊन, मग बहिणीने केले हे...

वरुड (जि. अमरावती) : मुकुलला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी तो धरून निघून गेला. गुरुवारी (ता. 13) 2020 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पुन्हा घराबाहेर पडला. त्याच दिवशी त्याचा मृतदेह जागृत शाळेच्या मागे एका घराच्या जवळ आढळला.

मुकुल भोगे (वय 32), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (ता. 25) रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला.

शवविच्छेदन अहवालात सत्य उघड

मुकुल भोगे याच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक शवविच्छेदन अहवाल वरुड पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये गुदमरून, रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने व गळा आवळल्यामुळे मुकुलचा मृत्यू झाल्याचे कारण नमूद होते. वायरने गळा आवळून मुकुल याचा खून केल्याचे त्यात नमूद होते.

बहिणीला केली अटक

घरी मुकुल, त्याची वृद्ध आई आणि बहीण शुभांगी गोपाल बेलसरे (वय 43) या तिघांव्यतिरिक्त कुणीच राहत नव्हते. त्यामुळे बहिणीने कट रचून त्याचा खून केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले. मंगळवारी (ता. 25) रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. बुधवारी (ता. 26) मृत मुकुलच्या बहिणीला खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. सध्या वृद्ध आईची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुनाच्या कारणाचा शोध सुरू
प्रथमदर्शनी चौकशीअंती बहिणीनेच भावाचा खून केल्याचे दिसून येते. खुनाचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहेत.
- मगन मेहते, पोलिस निरीक्षक, वरुड ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com