कार अपघातात दृष्टीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - भरधाव कार अनियंत्रित झाल्याने खांबाला धडकली. या अपघातात कारमधील सहा जणांपैकी २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी युवतीच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. दृष्टी मिलिंद सोनारकर (वय १९, रा. समता ले-आउट, अंबाझरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.आरोपी युवक दर्शन उदय तिवारी (वय २०, हनुमान सरोदेनगर, खामला), दृष्टी, आयुष खेडकर, राजेश पात्रीकर, तारक बडकर, अथर्व जोशी महागड्या कारने लाँग ड्राइव्हला गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते घरी परतत होते.

नागपूर - भरधाव कार अनियंत्रित झाल्याने खांबाला धडकली. या अपघातात कारमधील सहा जणांपैकी २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी युवतीच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. दृष्टी मिलिंद सोनारकर (वय १९, रा. समता ले-आउट, अंबाझरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.आरोपी युवक दर्शन उदय तिवारी (वय २०, हनुमान सरोदेनगर, खामला), दृष्टी, आयुष खेडकर, राजेश पात्रीकर, तारक बडकर, अथर्व जोशी महागड्या कारने लाँग ड्राइव्हला गेले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते घरी परतत होते. कॅम्पस चौकाकडून अंबाझरी बायपासकडून जात असताना अंबाझरी गार्डनसमोर भरधाव कार खांबाला धडकली. 

कार अपघातात दृष्टीचा मृत्यू
यात दर्शनसह त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले, तर दृष्टीच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दृष्टी रामटेक येथील केट्‌स इंजिनिअरिंग कॉलेजची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. दर्शन आणि त्याच्या मित्रांनी फुटाळा परिसरात एका ठेल्याजवळ मद्यप्राशन केले होते. नशेत असताना कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

...तर दृष्टीचा जीव वाचला असता 
भरधाव कार खांबाला धडकल्यानंतर हवेत उलटून खाली पडली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून अपघात किती भयानक होता, हे लक्षात येते. दर्शन व त्याचे मित्र किरकोळ जखमी झाले. मात्र, दृष्टी गंभीर जखमी झाली. बेशुद्ध दृष्टीला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी दर्शन व त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनी दृष्टीला वेळीच उपचारार्थ दाखल केले असते, तर तिचा जीव वाचला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दृष्टीचे वडील सैन्यदलातून निवृत्त असून, सध्या रेल्वे विभागात कार्यरत आहेत.

Web Title: Drushti death in a car accident