मोहन भागवत यांना डीएससी पदवी बहाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना गुरुवारी (ता. ९) वसंतराव देशपांडे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्‍टर ऑफ सायन्स (डीएससी) ही मानद पदवी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बहाल करण्यात आली आहे. 

मुक्‍या जनावरांचे निदान करणे सोपे नसते. त्यासोबतच काही जनावरे चावतात किंवा लाथ मारतात त्यांच्यावरदेखील प्रेमळपणे उपचार करण्याचे कसब पशुवैद्यकांमध्ये आहे. पशुवैद्यक क्षेत्राला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती. ती आता मिळू लागली आहे, याचे समाधान असल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. ९) पार पडला. याप्रसंगी  राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, कुलसचिव डॉ. ए. एस. बन्नाळीकर उपस्थित होते.

हे ठरले सुवर्णपदकाचे मानकरी
माफसुच्या आठव्या दीक्षान्त समारंभात नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाची अश्‍विनी चाफले हिला ८ सुवर्ण व दोन रौप्यपदके तर तिष्ता जोसेफ हिला दोन सुवर्ण व १ रौप्यपदक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा परमेश्‍वर पलमाटे दोन सुवर्णपदके व याच
महाविद्यालयाची डॉक्‍टर अनुष्का हेमांग हिला १ सुवर्ण व १ रौप्यपदक, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा आशीषकुमार त्रिपाठी व मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाची संजना कर्वे, शगुप्ता अब्दी हे प्रत्येकी एका सुवर्णपदकाचे मानकरी ठरली. पशुवैद्यक शाखेत नीता सुरवडे हिला दोन सुवर्णपदक, अमितकुमार येस्कल व चंद्रकांत भाळे यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले. मत्स्य विज्ञान शाखेत शुभ्रा यादव हिला सुवर्ण व दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी परमेश्‍वर काटे याला ३ सुवर्णपदके व प्रीती मुदीराज हिला तपस्वणी सावित्रीबाई फुले सुवर्णपदक व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: dsc degree to mohan bhagwat