रितिका ठक्करचा डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर ः गोवा येथे झालेल्या पश्‍चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या रितिका ठक्करने दुहेरी यश संपादन करून आपली छाप सोडली. तिने 19 वर्षे मुली आणि महिला दुहेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबईच्या सिमरन सिंघीच्या साथीने खेळताना 19 वर्षे मुलींच्या दुहेरीत रितिकाने लिडीया बरेटो आणि यास्मिन सय्यद जोडीचा 21-11, 21-10 असा पराभव केला. महिला दुहेरीत रितिका आणि सिमरनने आक्रमक खेळाच्या जोरावर दीप्ती कुट्टी आणि शेनान ख्रिस्तीयनला 21-7, 21-15 असे नमविले. ती हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थी असून रॉबीन सायमन आणि अजय दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

नागपूर ः गोवा येथे झालेल्या पश्‍चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या रितिका ठक्करने दुहेरी यश संपादन करून आपली छाप सोडली. तिने 19 वर्षे मुली आणि महिला दुहेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबईच्या सिमरन सिंघीच्या साथीने खेळताना 19 वर्षे मुलींच्या दुहेरीत रितिकाने लिडीया बरेटो आणि यास्मिन सय्यद जोडीचा 21-11, 21-10 असा पराभव केला. महिला दुहेरीत रितिका आणि सिमरनने आक्रमक खेळाच्या जोरावर दीप्ती कुट्टी आणि शेनान ख्रिस्तीयनला 21-7, 21-15 असे नमविले. ती हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थी असून रॉबीन सायमन आणि अजय दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरी विजेतेपद मिळविल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duble crown for Ritika