चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बसचा अपघात टळला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जामली (नागपूर) - धारणी येथून जामलीमार्गे परतवाड्याकडे येणाऱ्या एसटी बसचे चाक अचानक निखळले; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. 

जामली (नागपूर) - धारणी येथून जामलीमार्गे परतवाड्याकडे येणाऱ्या एसटी बसचे चाक अचानक निखळले; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. 

ही एसटी बस रविवारी (ता. 22) दुपारी दोनच्या सुमारास धारणीहून परतवाड्याकडे चालाली होती. भरधाव बसचे चाक बेरिंगमधून सटकल्याने अचानक निखळले. हे चालकाच्या लक्षात येताच त्याने बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवल्याने अपघात टळला. या बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते. या प्रकाराबद्दल आगारप्रमुख बल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. एसटी महामंडळाकडून मेळघाटात जुन्या व भंगारात निघणाऱ्या बस पाठविण्यात येत असल्याने त्या रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे प्रवाशांची तक्रार आहे. 

Web Title: Due to the bus driver ST bus accident was avoided

टॅग्स