गर्दीमुळे "खाकी' त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नागूपर : महानायक अमिताभ बच्चन यांनी एका निवांत क्षणाचे छायाचित्र आपल्या ब्लॉगवर पोस्ट केले आहे. या छायाचित्रात अमिताभ निवांत दिसत असले तरीही त्यांची एक झलक बघण्यासाठी महाराजबाग चौकात डेरा टाकून बसलेल्या चाहत्यांना आवरताना पोलिसांची आणि बाउन्सर्सची दमछाक होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या आवारात "झुंड' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याठिकाणी सदर पोलिस स्टेशन, जिल्हा न्यायालयाचा सेट उभारण्यात आला आहे. हा भाग शहराच्या मध्यभागी असल्यामुळे तशीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे शुटिंग म्हटल्यावर चाहत्यांना कोण रोखणार. दोन दिवसांपासून अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करीत आहेत. शुटिंग टीमचा भाग असलेले बाउन्सर्स कडक पहारा देत असले तरीही गर्दीने त्यांना हैराण करून सोडले आहे. शिवाय याच चौकात गेल्या तीन दिवसांपासून कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे जॅम होणारे ट्राफिक कंट्रोल करावे की अमिताभ यांना बघण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्या चाहत्यांना आवरावे, असा प्रश्‍न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता. 27) रात्री अमिताभ यांनी स्वतः ट्‌वीटरवरून चाहत्यांच्या गर्दीचे छायाचित्र पोस्ट केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे व संपूर्ण टीमने कमालीची गुप्तता पाळली असली तरीही चाहते प्रत्येक टप्प्यावर अमिताभ यांच्या मागावर आहेत.

Web Title: Due to the crowd "Khaki" Stroke