शेत रस्त्यांमुळे बुडाला खरीप

Road0
Road0

अकोला : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, अख्खा खरीप उद्‍ध्वस्त होण्यासाठी शेत रस्त्यांची दूरवस्था कारणीभूत ठरली आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विकास मार्ग रोखला गेला असून, त्यासाठी प्रशासनाचेच उदासीन धोरण नडले आहे.

खडतर, अल्प पावसातही चिखलाने तुंबणारी व अतिक्रमणात अडकलेली रस्ते अकोल्यासह राज्यभरातील शेती व शेतकऱ्यांच्या विकासातील सर्वात मोठी अडचण बनली आहे. त्यासाठी शासनस्तरावरून पाऊले उचलणे अत्यंत गरजेचे होते. मात्र वर्षोगणती शेतकरी या समस्येला सामोरे जात असून, कोणतेही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर, राज्यभरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेती पिकांच्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. खरीप, रबीतही शेतात वाहन जाऊ शकत नसल्याने, यांत्रीकिकरण व माल वाहतूक होऊ शकत नाही.

यावर्षी सुद्धा शेत रस्त्यांची दूरवस्था असून, अजूनपर्यंत चिखलाने, पाण्याने शेत रस्ते तुंबलेले आहेत. त्यामुळे निंदणी, डवरणी, फवारणी, सोंगणी, मळणी आणि शेतमालाची वाहतूक सुद्धा शेतकरी करू शकले नाहीत आणि याच कारणाने, शेतमाल शेतातच पडून राहिला, सडला आणि अख्खा खरीप उद्‍ध्वस्त झाला आहे.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचा फज्जा
अजूनही अनेक शेतांना योग्य रस्ता नसल्याने पावसाच्या दिवसांमध्ये शेतकरी व शेतमजूर या शेतात पोहचू शकत नाहीत तसेच शेतरस्त्यांच्या दूरवस्थेमुळे बैलगाडी, पीक काढणी यंत्र, मळणी यंत्र आणि शेतमाल वाहतूक करणे अशक्य झाले आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून, राज्य सरकारने नऊ महिन्यांपूर्वी पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी कच्चे रस्ते तयार करण्यासाठी पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना आखण्यात आली होती व त्या अंतर्गत फेब्रुवारी 2019 मध्ये 51 कोटी रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध सुद्धा करून देण्यात होता. मात्र अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातही या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाला असून, तीन महिन्यांपासून शेतरस्त्यांना नाल्यांचे स्वरुप आल्याने शेतकऱ्यांना शेतात पोहचता आले नाही आणि जवळपास दोन ते अडिच हजार कोटी रुपयांचे पीक शेतातच सडून उद्‍ध्वस्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com