नागपूरमध्ये घराला आग लागल्याने जोडप्याचा होरपळून मृत्यू

मनोज खुंटाटे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात काल (ता. 28) रात्री दुर्देवी घटना घडली. तालुक्यातील थुगाव निपाणी येथे रात्री अचानक लागलेल्या आगीत एका घरात राहणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्याचा झोपेत असताना आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जलालखेडा(नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात काल (ता. 28) रात्री दुर्देवी घटना घडली. तालुक्यातील थुगाव निपाणी येथे रात्री अचानक लागलेल्या आगीत एका घरात राहणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्याचा झोपेत असताना आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तसेच, बाजूचे एक घरही या आगीत पूर्ण जळाले आहे. सुदैवाने त्या घरात कोणीच नसल्याने या घरात कोणतीही जिवीतहाना झाली नाही. या घटनेने संपूर्ण नरखेड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सात बकऱ्याही होरपळून मरण पावल्या आहेत. थंडीचे दिवस असल्याने हे म्हातारे जोडपे जेवण करून झोपी गेले होते. पण काल (ता. 28) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या झोपडीवजा असलेल्या घराला अचानक आग लागली व आगीने रौद्ररूप धारण केल्याने या म्हाताऱ्या जोडप्याला बाहेर निघता आले नाही व त्यांचा आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्यामध्ये किसना बळीराम बालसाकरे (80) व मीराबाई किसनाजी बालसाकरे (75) यांचा समावेश आहे. तर यात त्यांच्या सात बकऱ्याही जाळून मरण पावल्या. तसेच या आगीत जगन मंगलदास वैष्णव यांचेही घर जाळून राख झाले. पण ते यावेळी घरी नव्हते. पण जळालेल्या घराचे संपूर्ण नुकसान झाले व जिवनावश्यक वस्तूही शिल्लक राहिल्या नाहीत. थंडीचे दिवस असल्याने सर्व गाव झोपी गेल्यामुळे आग लागल्याचे गावकऱ्यांच्या उशिरा लक्षात आले.

Web Title: Due to fire in the house in Nagpur, the death of the couple