हरतालिका पूजेने औषधी वनसंपदा धोक्यात

हरतालिका पूजेने औषधी वनसंपदा धोक्यात

ःअकोला- हरतालिकेच्या सणामुळे शहरात पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती बाजारात विक्रीला आल्या. त्यामध्ये आवश्यक असलेल्या वनस्पतींसह इतरही बहूमुल्य वनस्पती बाजारात विक्रीस आली असल्याने अनावश्यक असलेल्या वस्तुंसाठी वनसंपदा ओरबडली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्येक सण हा ऋतू आणि मानवी शहीरामध्ये त्या ऋतूमध्ये होणारे बद धार्मिक महत्त्व तर आहेच. परंतु, त्याचबरोबर त्याचे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. हरतालिकेच्या सणामुळे शहरात पूजेसाठी झुडुपं, गवत, छोटी रोपं, शेंगा, फळं, पानं, झाडांची सालं अशा प्रत्येक रुपात हा औषधी ठेवा जिवंत असतो. वनौषधींच्या क्षेत्रात कार्यरत राहिलेले नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉ.उमाशंकर दिक्षीत सांगतात, ‘अशा वनौषधींच्या ठेव्याचा मुख्य स्त्रोत हा जंगलांमध्येच असतो.त्यामुळेच वर्षानुवर्षांपासून जंगलांची खडानखडा माहिती असलेल्या आदिवासींच्या मदतीखेरीज अनेक औषधी वनस्पतींपर्यंत आपल्याला पोहचताही येत नाही. अनेक औषधी वनस्पती जसे भुईआवळा यासारख्या वनस्पती या ऋतूमध्येच उगवतात.

टॉनिकसारखं उपयोगी होणारे गुळवेल याच ऋतूत आढळते. डाळिंब आणि मसाल्याच्या झाडांची या औषधींमध्ये वापर केला जातो. गुडघेदुखीवरचा निर्गुडीचा पाला म्हणचेच पानांच्या स्वरुपातही ही औषधे उपयोगात आणली जातात. कडुनिंब, आवळा, हिरडा, बेहडा हे मोठ्या वृक्षाच्या स्वरुपात असतात. शतावरी, गुग्गुळ यांचेही औषधी उपयोग असतात. यातल्या वावडिंग, मुरुडशेंग यासारख्या काही झाडांना लवकर कीड लागते, असेही आजकाल लक्षात येतं. ही कीड सभोवतीच्या वातावरणातील बदलांमुळे लागते की, त्याचं आयुर्मामन च तसं असतं, याचंही कुतूहल वाटतं. नागरमोथासारखं औषध तर उटण्यापासून वजन घटविण्याच्या औषधांपर्यंत अनेक ठिकाणी उपयोगात येतं. नागकेशरसारखं औषध हे फुलांच्या फुलकेसरापासून बनतं. काही वर्षांपूर्वी जे 800 रुपये किलो दराने मिळायचं, तेच आता तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे.

निसर्ग सहवास झाला कमी
साधारण 30 वर्षआंआधी ही पूजा करणाऱ्या महिला पूजेसाठी लागणारी फळे, फुले आणि वनस्पती आपल्या परिसरातून गोळा करून ती पूजेसाठी वापरताना दिसत होत्या. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या वनस्पतींचा सहवास आवश्यक असतो. मात्र, आज बाजारात पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक वनस्पतींसह इतरही अनावश्यक वनौषधी वनसंपदा थोड्याशा फायद्यासाठी ओरबडून आणली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनसंपदेचे संगोपन कसे होईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पूजेसाठी वापरली जाणारी वनौषधी
केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा, अशोकपत्री, अशोक, आवळी, दूर्वा, कन्हेर, कदंब, ब्राम्ही, आघाडा, बेल व इतर. 

जगाने जाणले ते आम्हीच विसलो
भारतात वनौषधींच्या संवर्धानासाठी राष्ट्रीय वनौषधी मंडळ (नॅशनल मेडिसिनल लॉन्ट बोर्ड) उभे करण्यात आले. राज्याराज्यांमध्ये वनौषधींच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम या मंडळातर्फे ठरविण्यात आले. महाराष्ट्रातही अशा प्रकारचा उपक्रम राज्य सरकारतर्फे घोषीत करण्यात आला. केंद्राच्या मंडळाने आयुर्वेद, योग, युनानी, नेचरोपॅथी, होमिओपॅथी या सर्व वैद्यक शाखांच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वनौषधींच्या संवर्धनासाठी उपक्रम हाती घेतले. जगभरात अशा वनौषधींचा व्यापार 120 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. जगभर वनऔषधांचा वाप वाढत आहे. मात्र, जन्मदात्या भारतातील नागरिकांनाच त्याचा विसर पडत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com