पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोघांचा धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पाणी पिण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. तालुक्यातील वळजी भेंडी धरणावर ही घटना घडली.

खामगाव : पाणी पिण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. तालुक्यातील वळजी भेंडी धरणावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या वाडजी भेंडी धरण परिसरात मेंढ्या चराईसाठी निंबाजी महादेव खाडपे, भालेगाव व मंगेश विलास हटकर नांद्री हे दोघे गेले होते. पाणी पिण्यासाठी गेले असता धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Due to the water drowning in the dam the two die