दिवाळीदरम्यान अनेक मार्गांवर ज्यादा बसफेऱ्या 

file Photo
file Photo

नागपूर  : कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारे दिवाळीत घरी परततात. बाहेरगावी जाणाऱ्यांचा ओढा अधिक असल्याने खासगी वाहतूकदार भरमसाठ दर वाढवून प्रवाशांची लूट करतात. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीदरम्यान वेगवेगळ्या मार्गांवर ज्यादा बसफेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्‍त सुविधेमुळे ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
खासगी वाहतूकदार प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करतात. सोबतच खासगी प्रवासी वाहने वेळा पाळत नसल्यानेही प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांचा वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी एसटी महामंडळातर्फे शिवशाही वातानुकूलित व अन्य बसेस चालविण्यात येणार आहेत. पुण्यासाठी 21 ते 24 ऑक्‍टोबरदरम्यान ज्यादा बसेसची व्यवस्था राहील. पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांसाठी 23 व 24 ऑक्‍टोबरला रात्री तीन बसेस सुटतील. 25 ला तब्बल सात बसेस नागपूरसाठी सोडण्यात येतील. 26 ऑक्‍टोबरलासुद्धा बसेस उपलब्ध राहतील. याशिवाय 23 ते 26 ऑक्‍टोबर नागपूरहून माहूर, किनवट, आकोट, मोर्शी, पुसद, अमरावतीदरम्यान ज्यादा बसेसची सुविधा उपलब्ध राहणार आहे. सावनेर-अमरावती, रामटेक-परतवाडा, काटोल-माहूर, काटोल-अकोला, सावनेर-माहूर, उमरेड-परतवाडा या बसेसही नागपूरच्या गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकमार्गे धावतील.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com