बिबामल गावात इ-वन वाघिणीची दहशत

प्रतीक मालवीय
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

धारणी (जि. अमरावती) ः मागील दोन महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी जंगलातील आणलेल्या इ-वन वाघिणीने मेळघाटच्या बिबामल व आजूबाजूच्या वनपरिक्षेत्रातील गावांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या वाघिणीने आजूबाजूच्या पाच गावांत नागरिकांवर हल्ले केले आहेत.

केकदाखेळा येथील एका पाच वर्षीय मुलीवर वाघिणीने हल्ला केला. यात ती ठार झाली. कावडाजिरी येथे एका म्हशीवर हल्ला करून तिला ठार केले. बिबामल गावातील सुंदरलाल सुखराम मेटकर यांची दोन गाई व वासरूही वाघिणीने फस्त केले. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वाघिणीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
माजी आमदारांचा आंदोलनाचा इशारा
इ-वन वाघिणीच्यासंदर्भात वारंवार प्रशासनाला निवेदन दिले आहे. या वाघिणीला बंदिस्त करून इतरत्र जंगलात सोडण्यात यावे, असे निवेदन दिल्याचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले. मात्र व्याघ्र प्रकल्पाद्वारे याची कुठलीही दक्षता घेतली जात नाही. नरभक्षक वाघीण आता गावात फिरत असून कोणत्याही क्षणी लोकांवर हल्ला करू शकते. त्यामुळे चार दिवसांच्या आत या वाघिणीचा बंदोबस्त करावा; अन्यथा 3 सप्टेंबर 2019 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजकुमार पटले यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-One Waghini Terror in Bibamal Village