कोराडीत वृद्धांच्या सेवेसाठी "ई-रिक्षा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कोराडी (जि.नागपूर) : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्र उत्सवात मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सोय म्हणून यात्रेतील वृद्ध व अपंगांसाठी संस्थने या वर्षी पहिल्यांदाच ई-रिक्षाची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच येथील स्वच्छता भाविकांसाठी प्रशंसेची ठरत आहे.

बसस्थानक वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंत ये-जा करायला दहा ई-रिक्षा सतत सेवेत आहेत. वृद्ध भाविकांना पूजेचे साहित्य घेण्यासाठी ही ई-रिक्षा सेवा देण्यात येत आहे. यात्रेतील भाविकांना प्रसाद घेण्याची जबाबदारी मानव सेवा संस्थान नागपूर यांनी घेतली आहे. या संस्थानने यात्रेतील सर्व भाविकांना प्रसाद देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रसादाच्या रूपाने साबुदाणा खिचडी, हलवा, चणा उसळ आदी प्रसाद भाविकांना दिला जातो. या क्षेत्रातील स्वच्छता उल्लेखनीय आहे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायत व मंदिर संस्थान सतत कार्य करीत आहे. कोराडीला दर पाच मिनिटाला बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टार बस व्यवस्थापनाच्या वतीने नागपूर येथून स्थानकावरून दर दहा मिनिटाला कोराडी यात्रेसाठी सोडण्यात येत आहे. शहरातील स्वामी नारायण मंदिर, नरसाळा, पिपला फाटा, खामला, कामठी, गोरेवाडा येथूनही बसेस सोडण्यात येत आहेत. महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचा पर्यावरणपूरक उपक्रमाचे भाविक कौतुक करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-rickshaw for the elderly