"लाडू खाल्ला अन्‌ मान टाकली'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

"लाडू खाल्ला अन्‌ मान टाकली'
नागपूर : एर्नाकुलम-पाटणा एक्‍स्प्रेसमधून दोन कोटी आणि 10 किलो सोन्याचे दागिने घेऊन एक जोडपे रेल्वेतून प्रवास करीत असल्याची खबर रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार नागपूरच्या पथकाने धावत्या रेल्वेत त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्यापर्यंत पोहोचताच दोघेही मृतावस्थेत आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. सोमवारी ही घटना नागपूर ते नरखेड स्थानकादरम्यान उघडकीस आली. सहप्रवाशांच्या माहितीनुसार दोघेही तणावात होते. त्यांनी नागपूर ते नरखेडदरम्यान जवळचा लाडू काढून खाल्ला आणि मान टाकली.

कन्याकुमारी येथील एका आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेले युगुल एर्नाकुलम- पटणा एक्‍स्प्रेसमधून प्रवास करीत असून त्यांच्याकडे दोन कोटींची रोख आणि दहा किलो सोने माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. ही गाडी नागपूर स्थानकावर येताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने गाडीचा ताबा घेत त्यांचा तपास सुरू केला. गाडी सुरू झाल्यानंतरही शोधाशोध सुरूच होती. नरखेड स्थानकाजवळ सकाळी 9.40 वाजता दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले. तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. त्यांच्याकडे कोट्यवधींचा मुद्देमाल असल्याची सूचना असल्याने जवानांनी त्यांचे सामानही जप्त केले. लोहमार्ग पोलिसांनी प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळख दर्शविणारी कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. मोबाईल क्रमांकावरून त्यांचे नातेवाईक कन्याकुमारी येथे वास्तव्यास असल्याचा धागा पोलिसांना मिळाला आहे. लोहमार्ग पोलिस त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकली नव्हती.
मुद्देमाल गेला कुठे?
दोघेही एस- 5 क्रमांकाच्या डब्यातून 10 व 11 क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत होते. त्यांचे सामान रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले. पण, सूचनेनुसार रोख आणि सोने आढळले नाही. कोट्यवधींचा मुद्देमाल गेला कुठे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
आत्महत्या की घातपात?
सहप्रवाशांच्या माहितीनुसार दोघेही तणावात होते. त्यांनी नागपूर ते नरखेडदरम्यान जवळचा लाडू काढून खाल्ला आणि मान टाकली. त्यानंतर ते उठलेच नाहीत. ही आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Eat ladoo and put a neck