आर्थिक दुर्बलांसाठी वाढणार 19 जागा 

आर्थिक दुर्बलांसाठी वाढणार 19 जागा 

नागपूर - केंद्र शासनाने देशभरात आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली. या घोषणेला वर्षही उलटत नाही तोच या आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण लागू करण्याचे निर्देश आले आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी 19 जागांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती पुढे आली. विशेष असे की, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला प्रस्ताव सादर झाला आहे. 

आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्याने खुल्या संवर्गासाठी असलेल्या 50 टक्के जागांमध्ये कपात झाली. यामुळे याचा फटका खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बसू नये या हेतूने तत्काळ मेडिकलमध्ये 19 जागा वाढविण्याचे धोरण तयार करण्यात आले. यामुळे आगामी वर्षात होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमात खुल्या वर्गांतील उमेदवारांची संख्या कमी होणार नाही. उलट 19 जागा वाढीमुळे त्यांचा टक्का अधिक वाढेल हे मात्र नक्की. मेडिकलमध्ये उपलब्ध वैद्यकीय शिक्षकांच्या तुलनेत कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर जागा वाढवण्यात येणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी मेडिकलच्या अस्थिरोग विभागात सध्या मंजूर असलेल्या 6 जागांमध्ये आणखी 13 जागांची भर पडेल. तसेच मेडिसीन विभागातील 5 जागा वाढतील. तर एक जागा श्‍वसनविकार विभागात वाढणार आहे. अशा एकूण 19 जागा वाढणार आहेत. तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याला दिला आहे, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे म्हणाले. 

याशिवाय 82 जागा वाढीचे संकेत 
सध्या मेडिकलच्या पदव्युत्तर विभागात 189 जागा आहेत. यात आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या 19 जागा निश्‍चित वाढणार आहेत. याशिवाय भारतीय वैद्यक परिषदेकडे 82 जागा वाढीचे संकेत आहेत. मात्र 82 जागा वाढीसाठी भारतीय वैद्यक परिषदेचे निरीक्षण होईल. या जागावाढीमुळे रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्‍टरांची संख्या वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com