महाविद्यालयांमध्ये आजपासून वाढणार गर्दी

Mission-Admission
Mission-Admission

नागपूर - बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाने दिलेल्या समान प्रवेश प्रक्रियेनुसार पदवी प्रवेशासाठी अर्जविक्रीला सुरुवात झाली आहे. दहावीच्या निकाल लागण्याआधीच अकरावी प्रवेशाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या सोमवारपासून (ता.३) प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असून प्रवेश अर्ज खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून येणार आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मागील वर्षी पदवी प्रवेशादरम्यान समान वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार संलग्नित कॉलेजेसला ६ जुलैपर्यंत प्रवेश करण्याची मुदत देण्यात  आली आहे. ८ जुलैपासून समुपदेश तसेच प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहे. तत्पूर्वी २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून गुणवत्ता यादी प्रकाशित करायची आहे.

त्यामुळे विद्यार्थी नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. दुसरीकडे राज्याच्या शिक्षण विभागामार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या भाग भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेशासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेलाही सोमवारपासून वेग येणार आहे.

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत सीबीएसई, आयसीएसई आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना १९ केंद्रातून माहितीपुस्तिकांची खरेदी आणि अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. दहावीच्या निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com