अकरावी प्रवेशात घटले सीबीएसईचे विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर  : दरवर्षी राज्य मंडळाकडे ओढा असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन फेऱ्यांमध्ये केवळ 4 हजार 987 विद्यार्थ्यांनीच अकरावीत अर्ज नोंदविले आहे. त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले आहेत. याउलट आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या 25 हजार 294 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

राज्यभरात जून महिन्यापासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रक्रियेदरम्यान अकरावीच्या 58 हजार 240 जागांसाठी 30 हजार 654 अर्ज भरले. यापैकी 25 हजार 294 अर्ज राज्य शिक्षण मंडळ तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी 4 हजार 987 अर्ज नोंदविले. इतर बोर्डातील जवळपास 111 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले आहे. गेल्या वर्षी जवळपास सहा हजारांवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले होते. त्यापैकी पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, यावर्षी बोर्डातील अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यात आल्याने सीबीएसई शाळांमध्येच अकरावीचे वर्ग हाउसफुल्ल असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत द्विलक्षी अभ्यासक्रमात 2 हजार 303 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्यात आले. यामध्ये पहिल्या फेरीत 14 हजार 716 तर दुसऱ्या फेरीत 3 हजार 810 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे दुसऱ्या फेरीअखेर जवळपास 37 हजार 411 जागा रिक्‍त आहेत. आता गुरुवारपासून प्रवेशासाठी तिसरी फेरी घेण्यात येईल. त्यासाठी उद्या, गुरुवारी (ता. 1) प्रवेशाची यादी प्रकाशित करण्यात येईल. 2 ते 5 ऑगस्टदरम्यान प्रवेश दिले जातील. 6 ऑगस्टला विशेष फेरीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education news