सुलेखनाच्या जागरासाठी ध्येयवेडया अक्षरयात्रीची धडपड!

संतोष थोरहाते
बुधवार, 24 एप्रिल 2019

हिवरा आश्रम : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शुद्धलेखन व हस्ताक्षर लेखनाचे महत्व कमी होत आहे. अशा परिस्थिती सुलेखनाचे अस्तित्व टिकविण्याचे ध्येय उराशी बाळगून देऊळगाव राजा येथील प्रल्हाद कायंदे यांनी सकारात्मक प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सुलेखनाची गोडी लावून पाचशेहून अधिक व्यक्तींना पत्रव्यवहार केला आहे .

हिवरा आश्रम : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शुद्धलेखन व हस्ताक्षर लेखनाचे महत्व कमी होत आहे. अशा परिस्थिती सुलेखनाचे अस्तित्व टिकविण्याचे ध्येय उराशी बाळगून देऊळगाव राजा येथील प्रल्हाद कायंदे यांनी सकारात्मक प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सुलेखनाची गोडी लावून पाचशेहून अधिक व्यक्तींना पत्रव्यवहार केला आहे .
मनातील तरल भावना शब्दाव्दारे पत्रातून व्यक्त करण्याची मज्जा काही औरच आहे. पत्रलेखनातून भावोत्कट विचार  सहज व्यक्त करता येतात. पत्रलेखनातून विचार करण्याला चालना मिळते, शब्दकोषात भर पडते. पत्रलेखनातून वैचारिक विचारांची देवाणघेव होते. मात्र सोशल मिडीयाच्या काळात पत्रलेखनाचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

मेल, व्हॉटसअ‍ॅप्स, इंस्टग्रामच्या काळात मॅसेजव्दारे थोडक्यात संदेश पाठविला जातो. यामुळे भावी पिढीचे शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या काळात सुध्दा देऊळगांव राजा येथील प्रल्हाद गणपराव कांयदे यांनी  सुंदर हस्ताक्षर व शुध्द लेखनाची चळवळ सुरू  ठेवली आहे. त्यांनी सुंदर हस्ताक्षराचा प्रसार आणि प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रल्हाद कायंदे यांनी विद्यार्थ्यांच्या  मनावर सुंदर हस्ताक्षराचे महत्व बिंबविले आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तंत्र समजून ते विद्यार्थ्यांकडून हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव करून घेतात.

शाळेतील विद्यार्थ्यांनी लेखकांना पत्रलेखन चळवळीला गती देण्यासाठी अभिनंदन पत्र,वाढदिवस पत्र,नियुक्ती बददल अभिनंदन पत्र,कार्यगौरव पत्र आपल्या सुंदर हस्ताक्षरांनी  पत्रे पाठवितात. प्रल्हाद कायंदे यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक व्यक्तींना आपल्या सुंदर हस्ताक्षरांची पत्रे पाठवून अनेकांची मने जिंकली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपत्री प्रतिभाताई पाटील, शरद पवार, कर्मयोगी संत प.पू . शुकदास महाराज, प्रतापराव पवार, सचिन तेंडूलकर, सुनिल गावस्कर, भालचंद्र नेमाडे, वीणा गव्हाणकर, कवी प्रविण दवणे, समाजसेवक अभय बंग, प्रकाश आमटे यांच्यासारख्या अनेक प्रसिध्द व्यक्तींना त्यांनी पत्र पाठविली आहेत. प्रल्हाद कायंदे हे देऊळगांव राजा तालुक्यातील आसोला जहागीर येथील राजे संभाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. प्रल्हाद कायंदे यांना लहानपणापासून सुंदर हस्ताक्षराचे वेड लागले. प्रल्हाद कायंदे यांनी सुलेखनाव्दारे व पत्र व्यवहाराच्या माध्यमातून हस्ताक्षराची मोहिम यशस्वी केली आहे. सुलेखनकार अच्युत पालव, राम कस्तुरे, आत्मानंद थोरहाते, विनोद ठाकरे, ज्ञानेश्वर कवडे, शिरीष चव्हाण,नीलेश बागवे, प्रा.राजेंद्र हंकारे, कृष्णकांत ठाकुर यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन लाभत मिळत आहे.

'सोशल मिडीयाच्या काळात पत्रलेखनाची महत्व कमी होत आहे. पत्रलेखनामुळे विचारशक्तीला मिळते त्यासोबत शब्दकोषात सुध्दा भर पडते.  भावी पिढीच्या मनावर सुंदर हस्ताक्षराचे बीज रूजविण्यासाठी सुलेखनाचे विविध उपक्रम राबवित आहे.'

- प्रल्हाद गणपत कायंदे,सुलेखनकार देऊळगांव राजा

सुलेखनाच्या प्रचारासाठी अक्षरयात्री ग्रुप
शुध्द लेखनाचा व सुंदर हस्ताक्षराचा प्रसार आणि  प्रचार मोठया प्रमाणात होण्यासाठी त्यांनी अक्षरयात्री या नावाने व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप बनविला आहे. या ग्रुपवर नियमीत सुलेखन कसे करावे यासंबधी मार्गदर्शन केले जाते.

Web Title: efforts for good handwriting by Pralhad kayande