नक्षल्यांकडून युवक-युवतींना चळवळीत सामील करण्यासाठी प्रयत्न 

मनोहर बोरकर
बुधवार, 27 जून 2018

नक्षल चळवळ सध्या कमकुवत झाली असुन अदिवासी युवक व युवतींना आमिष दाखवून चळवळीत सामील करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा देश विघातक संघटनांपासून सावध राहवे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी केले आहे.

एटापल्ली (गडचिरोली) - नक्षल चळवळ सध्या कमकुवत झाली असुन अदिवासी युवक व युवतींना आमिष दाखवून चळवळीत सामील करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा देश विघातक संघटनांपासून सावध राहवे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी केले आहे.

गेली दोन वर्षात नक्षल चळवळ थांबविण्यात पोलिस विभाग यशस्वी झाला असून नागरिकांमध्येही जागृती होऊन नक्षल्यांमुळे या भागातील भौतिक विकास खूंटला  आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील सुज्ञ नागरिकांनी या चळवळीकडे पाठ फिरवल्याने नक्षलसमर्थक चालविणारे काही व्यक्ती अशिक्षित, अल्पशिक्षित तथा गरीब कुटुंबातील मजूरी करणारे युवक व युवतींना एकांतात हेरुन त्यांचे अज्ञान व दारिद्र्याचा फायदा घेऊन विविध प्रकारचे अमिष दाखवून नक्षल चळवळीत सामील करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे कोणासोबत घडल्यास किंवा आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी पोलिसांकडून सर्व माहिती गुप्त ठेऊन पीडित व्यक्तिस संपूर्ण मदत केली जाईल असेही जगताप यांनी आव्हान केले आहे.

काही दिवसांपूर्वी (ता. 23) शनिवारी रूपी नरोटी (वय 32) राहणार नारगुंडा तालुका भामरागड या महिलेने एटापल्ली येथील एक 14 वर्षीय बालिका व 22 वर्षीय महिलेस धमकी देऊन अपहरण करून नक्षल चळवळीत सामील करण्यास अतिसंवेदनशिल नक्षल्यांचा गड मानल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील लाहेरी या गावी नक्षल समर्थक दिनेश पुंगाटी याचे घरी ठेवले तसेच दूसऱ्या दिवशी (ता.24) रविवारी आणखी एका 12 वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यास रूपी नरोटी एटापल्लीत दाखल झाली, मात्र काही संज्ञान नागरिकांच्या सहकार्याने रूपीचा डाव फसला व पोलिसांनी तिला अटक करुण एक महिला व दोन शालाबाह्य बालिकांना नक्षल चळवळीत सामील होण्यापासून वाचविण्यात आले, त्यामुळे वेगवेगळ्या युक्ती करून युवक व युवतींना नक्षल चळवळीत सामील करणारी टोळी परिसरात सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहून प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी असे आव्हान पोलिस निरीक्षक जगताप यांनी केले आहे.

Web Title: Efforts to join the for youths in terrorist movement