चितळाची शिकार करणाऱ्या आठ आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

धाबा (जि. नागपूर) : चितळाची शिकार करणाऱ्या आठ जणांना वनविभागाने ताब्यात घेतले. मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वटराणा जंगलात गुरवारी (ता.12) ही घटना घडली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी वटराणा गावातील आहेत.

मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वटराणा जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने कारवाई करून गोंडपिपरी तालुक्‍यातील वटराणा गावातील रवी गेडाम याला शस्त्रांसह अटक केली. आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबाचा आधार घेत प्रमोद आत्राम, नितेश मेश्राम, आनंदराव गेडाम, विजय पोट्टे, सचिन उर्वते, विकास कळले, शंकर कोडापे या सातजणांना चौकशीसाठी वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वनपरीक्षेत्राधिकारी डी.एम. राउतकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहायक पी. पी. ढाले चौकशी करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight accused arrested in Chitral killing

टॅग्स