जमीन व्यवहाराची चौकशी नव्याने करा - खडसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - भोसरी एम.आय.डी.सी.तील जमीन खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीने मंगळवारी आपली चौकशी पूर्ण केली. तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी चौकशी समितीसमोर हजर राहत आपली बाजू मांडली. दरम्यान ही चौकशी नव्याने करण्यासोबतच साक्षीदारांना परत बोलावण्याची मागणी ही खडसे यांच्याकडून करण्यात आली. 

एम.आय.डी.सी. मधील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी केली जात आहे. निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नियुक्‍ती त्याकरिता करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी (ता. 28) झोटिंग समितीसमोर श्री. खडसे यांनी उपस्थित राहत आपली बाजू मांडली. या वेळी पुन्हा चौकशीची मागणी त्यांच्याद्वारे करण्यात आली. त्यासोबतच साक्षीदार पुन्हा तपासण्याचीही मागणी त्यांनी केली. पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांना साक्षी करता नव्याने बोलावण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली. 

Web Title: eknath khadse land issue