Video : भाजपचे सरकार सत्तेवर असताना कोणी केला नाथाभाऊंचा फोन टॅप?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावरुन दोन सदस्यीय समिती नियुक्त करून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान भाजपच्या काही नेत्यांचेही फोन टॅपिंग झाल्याची माहिती मिळाली.

नागपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा मुद्दा मधल्या काळात राजकीय वर्तुळात चांगलाच गाजला होता. या काळात भाजपच्या काही नेत्यांचे देखील फोन टॅप झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव असल्याचे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाथाभाऊंचा फोन टॅप करण्यामागे कोणाचे कारस्थान होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे, असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

 

यासोबतच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या ईमारतींवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, असे गृहमंत्री म्हणाले.

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावरुन दोन सदस्यीय समिती नियुक्त करून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान भाजपच्या काही नेत्यांचेही फोन टॅपिंग झाल्याची माहिती मिळाली. एकनाथ खडसेंचा फोन टॅप झाल्याचीही माहिती आहे. या समितीच्या अहवालानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.

- ट्यूबलाइटच्या स्फोटामुळे असंख्य जखमा...तरीही वाचला जीव, वाचा नेमके काय झाले!
 

सीसी टीव्हीतून ठेवणार कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये सीसीटीव्ही आहेत. मुंबई शहरात पाच हजार कॅमेरे आहेत. ही संख्या वाढवून 10 हजार करण्यात येणार आहे. बांधकामाच्या नियमांत बदल करून प्रत्येक ईमारतीवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार आहे. राज्याच्या प्रत्येक शहरातील मुख्य इमारतींवर कॅमेरे लावल्यास पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath khadse phone tapping while bjp in power