एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रचार चुकीचा - आमदार विजय शिवतारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla Vijay shivtare

चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ आमदारांचा गट घेऊन काँग्रेस पक्षात दाखल होणार असल्याची गुप्त बातमी मला खुद्द शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनीच सांगितल्याचे म्हणाले होते.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रचार चुकीचा - आमदार विजय शिवतारे

गोंदिया - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आज खळबळजनक खुलासा करीत तीन ते चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ आमदारांचा गट घेऊन काँग्रेस पक्षात दाखल होणार असल्याची गुप्त बातमी मला खुद्द शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनीच सांगितल्याचे म्हणाले होते. त्यावर गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी ( ता. २९) हिंदुगर्जना संपर्क यात्रेनिमित्त आलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी खैरे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते असून त्यांच्याकडून असा चुकीचा प्रसार योग्य नसल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार हे काँग्रेसमध्ये कधीही जाण्याचा विचार करू शकत नसल्याचे म्हणाले. येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला रामटेकचे खासदार कृपाल तुम्हाणे, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव, गोंदिया जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, बाप्पी लांजेवार, सुनील सेंगर उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याबद्दल सांत्वन केले.

आम्ही कट्टर बाळासाहेबांचे कार्यकर्ते असून बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या व्हीडीओ संदेशात काँग्रेसची पंचसुत्री देशात संपवा हा संदेश पहिला दिला. त्यानंतर माझ्यानंतर उद्धव व आदित्यला सांभाळून घ्या, असा सल्ला दिल्याचे सांगत बाळासाहेब कधीही काँग्रेससोबत युतीच्या बाजूने नव्हते, असे शिवतारे म्हणाले. काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर आधी शिवसेनेचे दुकान बंद करीन अशी भूमिका बाळासाहेबांची होती. त्यामुळे चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे हे काँग्रेससोबत येणार असल्याचे केलेले वक्तव्य पूर्णतःदिशाभूल करणारे असल्याचे ते म्हणाले.