प्रचारसाठी मिळणार फक्त 12 दिवस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. प्रचारासाठी फक्त 12 दिवसांचा काळ मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करावी लागेल.

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. प्रचारासाठी फक्त 12 दिवसांचा काळ मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करावी लागेल.
साधारणत: 45 दिवसाच्या आत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडवी लागते. राज्यात यंदा ही प्रक्रिया 30 दिवसातच पूर्ण होणार आहे. तसा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केला आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार 27 सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. त्याच दिवसापासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. 4 ऑक्‍टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. सुट्टीच्या दिवशी मात्र अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हाधिकरी अश्‍विन मुद्‌गल यांनी स्पष्ट केले आहे. 7 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून त्याच दिवशी आघाडी, अपक्षांना निवडणूक चिन्हही वाटप होईल. त्यामुळे 8 ऑक्‍टोबरपासून प्रचारला सुरुवात होईल. 21 ला मतदान होणार असल्याने 19 च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करता येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने 12 दिवसच प्रचाराला मिळणार आहे. 24 ला मतमोजणी होणार असून 27 ऑक्‍टोबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election campaign