निवडणुकीचे "काऊंटडाऊन' सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्‍टोबर असल्याने केवळ 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच घालमेल सुरू आहे. 27 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे.
युती तसेच आघाडीत मतदारसंघाची निश्‍चिती झाली नसल्याने सध्याच्या स्थितीत सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोर लावत आहेत. आघाडीत किंवा युतीत तो मतदारसंघ कुणासाठी सुटणार हे निश्‍चित नसल्याने त्यांची चांगलीच घालमेल होत असून खुल्या मनाने ते प्रचारात उतरलेले नाहीत.

अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील काही ठिकाणी पक्षांचे उमेदवार निश्‍चित आहेत. त्यांच्या प्रचाराने गेल्या महिन्यापासूनच वेग घेतला आहे. इच्छुकांनीसुद्धा संबंधित मतदारसंघाची चाचपणी करून आपले बस्तान कसे बसेल याची आखणी केली आहे. परंतु तिकीट मिळाल्याशिवाय पुढे कसे जायचे ही चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे असे उमेदवार सध्या "वेट ऍण्ड वॉच' च्या भूमिकेत आहेत. 2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढल्याने यंदा आघाडी किंवा युतीचा जिल्ह्यातील फार्मुला काय राहील याचा अंदाज लावणे येथील पदाधिकाऱ्यांनासुद्धा अशक्‍य झाले आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी वरिष्ठ स्तरावरूनच निर्णय होईल असे सांगत असून काही पक्षांनी सर्वच मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जास्त दिवस नसल्याने या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्‍यता असल्याचे पदाधिकारीसुद्धा मान्य करतात.

इच्छुकांचा मुंबईत ठिय्या
निवडणूक तारखांची घोषणा होताच काही इच्छुकांनी मुंबई जवळ केली असून आपल्या गॉडफादरच्या माध्यमाने पक्षाचे तिकीट आणण्यासाठी जोर लावला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election "countdown" begins