381 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर  : राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील विविध एक हजारावर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यात जिल्ह्यातील 381 ग्रामपंचायतींचा समोवश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होईल. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे येत्या 5 ते 11सप्टेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 12 सप्टेंबरला होईल. तर नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान बुधवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवार 27 सप्टेंबर रोजी मतमोजणीदेखील होईल. या ग्रामपंचायतींसाठी महिला आणि प्रवर्गाचे आरक्षण आधीच निश्‍चित करण्यात आले आहे.
भिलेवाडा ग्रा. पं.साठी पोटनिवडणूक
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी रामटेक तालुक्‍यातील भिलेवाडा सरपंचपदाची निवडणूक जिकलेल्या सरपंचाचा काही दिवसांनी मृत्यू झाल्यामुळे या ग्रा.पं.चे सरपंचपद रिक्त आहे. या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Web Title: election news nagpur gramin