निवडणूक अधिकाऱ्याला जानकरांची दमबाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नागपूर - पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, निवडणूक अधिकाऱ्याला दमबाजी करतानाचा व्हिडिओ बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक 18 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कपबशी हे निवडणूक चिन्ह द्या व कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करा, अशी तंबीच जानकर यांनी दूरध्वनीवरून दिली. निवडणूक अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार जानकरांकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर जानकर यांनी थेट दूरध्वनी करून अधिकाऱ्याला मोठ्या आवाजात दरडावत तंबी दिली.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याने जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांना 24 तासांच्या आत खुलासा द्यावा; तसेच खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिशीमध्ये नमूद केले आहे.

Web Title: Election officers threaten by jankar