Election Result 2019 : भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले पिछाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे तिसऱ्यांदा भाग्य आजमावणारे भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले पिछाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी पाचव्या फेरीत 800 मतांनी आघाडी घेतली आहे.

गोंदिया : चार विधानसभा मतदारसंघ असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील दोन मतदारसंघात आघाडी तर प्रत्येकी एका मतदारसंघात अपक्ष व भाजप आघाडीवर आहेत. भाजपचे माजीमंत्री राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे गोंदिया मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. 
अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे तिसऱ्यांदा भाग्य आजमावणारे भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले पिछाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी पाचव्या फेरीत 800 मतांनी आघाडी घेतली आहे. गोंदिया मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे उमेदवार माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागे टाकले आहे. चौथ्या फेरीअखेर जवळपास 2500 हजाराने विनोद अग्रवाल समोर आहेत. 
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आमगाव (देवरी) मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय पुराम यांना पिछाडीवर टाकत कॉंग्रेसचे उमेदवार सहसराम कोरोटे यांनी आघाडी घेतली आहे. तर, तिरोडा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. रविकांत बोपचे हे भाजपचे माजी खासदार खुशाल बोपचे यांचे पुत्र असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Result 2019: Former BJP minister Rajkumar Badole is back