Election Results 2019 : हिंगणघाट, आर्वीत भाजप, देवळीत कॉंग्रेसची विजयाकडे घोडदौड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आर्वी मतदार संघात भाजपचे दादाराव केचे यांनी पंधराच्या फेरीअंती 11 हजार 747 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे अमर काळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्धा मतदार संघात मात्र पाठशिवणीचा खेळ सुरू आहे.

वर्धा : विधानसभा निवडणुकीतील चारही मतदारसंघापैकी वर्धा वगळता देवळी, हिंगणघाट आणि आर्वी मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसते. वर्ध्यात मात्र पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. येथे कधी कॉंग्रेस पुढे तर कधी भाजपच असे चित्र आहे. चुरशीच्या लढतीत वर्ध्यात अकराव्या फेरीअंती भाजपचे पंकज भोयर पुढे आहेत. 
या चारही मतदारसंघात दहा फेऱ्यांवर मतमाजणी झाली आहे. यातील बाराच्या फेरीअंती अधिकृत माहितीनुसार हिंगणघाट मतदार संघात भाजपचे उमेदवार समीर कुणावार 32 हजार 770 मतांनी आघाडीवर आहे. त्यांची ही आघाडी विजयी आघाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू तिमांडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. देवळी मतदार संघात कॉंग्रेसचे रणजित कांबळे यांनी 23 हजार 971 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. येथे अपक्ष उमेदवार राजीव बकाने दुसऱ्या तर शिवसेनेचे समीर देशमुख तिसऱ्या क्रमांकावर आहे. 
आर्वी मतदार संघात भाजपचे दादाराव केचे यांनी पंधराच्या फेरीअंती 11 हजार 747 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे अमर काळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्धा मतदार संघात मात्र पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. येथे कधी भाजपचे डॉ. पंकज भोयर तर कधी कॉंग्रेसचे शेखर शेंडे आघाडी घेत आहे. सध्या अकराव्या फेरीअंती कॉंग्रेसचे शेखर शेंडे यांनी दोन हजार 824 मतांची आघाडी घेतली आहे. 
देवळीत कॉंग्रेसेचे रणजित कांबळे आणि हिंगणघाट मतदारसंघात समीर कुणावर यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष साजरा करणे सुरू केले आहे. तर आर्वीत भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांनी प्रत्येक फेरीत हळूहळू आघाडी घेत आपली विजयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केल्याचे दिसून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019: In Hinganghat, Arvi BJP, in Deoli Congress in the race of victory