Election Results 2019 : साकोलीत नाना पटोले- फुकेंमध्ये काट्याची लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भाजपचे डॉ. फुके व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात तुल्यबळ लढत असल्याने महाराष्ट्रातील सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. साकोली मतदार संघात पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेतली होती. यामुळे कॉंग्रेसचे नाना पटोले पराभवाच्या छायेत होते. मात्र, 10 व्या फेरीनंतर पटोले यांनी आघाडी घेत भाजपला मागे टाकले. भाजपचे फुके यांना 51,312 तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना 52,491 मते मिळाली आहेत.

भंडारा : मतमोजणीच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात असताना पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले साकोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके पिछाडीवर गेले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी त्यांना 1179 मतांनी मागे टाकले आहे. प्रत्येक फेरीत मागे-पुढे होत असल्याने तुमसरमध्ये काट्याची लढत सुरू आहे. 
भाजपचे डॉ. फुके व कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात तुल्यबळ लढत असल्याने महाराष्ट्रातील सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. साकोली मतदार संघात पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेतली होती. यामुळे कॉंग्रेसचे नाना पटोले पराभवाच्या छायेत होते. मात्र, 10 व्या फेरीनंतर पटोले यांनी आघाडी घेत भाजपला मागे टाकले. भाजपचे फुके यांना 51,312 तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना 52,491 मते मिळाली आहेत. यात पटोले यांनी मुसंडी मारून 1,179 मतांची आघाडी घेतली आहे. 20 फेऱ्या असल्याने भाजप-कॉंग्रेसमध्ये काट्याची लढत असून मतदारांमध्ये निकालाची उत्सुकता वाढली आहे. 
तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू कारेमोरे व अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. 20 व्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेले कारेमोरे यांना वाघमारे यांनी 21 व्या फेरीअखेर पिछाडीवर टाकले. मात्र, आघाडीचे मताधिक्‍य कमी असल्याने तसेच टपाली मते राष्ट्रवादीला अधिक असल्याने विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्कंठा वाढली आहे. 

भंडाऱ्यात नरेंद्र भोंडेकर विजयाकडे 
भंडारा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. पहिल्या फेरीपासून भोंडेकर यांनी आघाडी घेत भाजप उमेदवार अरविंद भालाधरे यांना मागे टाकले आहे. सध्या सात हजार मतांनी भोंडेकर आघाडीवर असून हे मताधिक्‍याचे अंतर गाठणे भाजपला शक्‍य नसल्याने भोंडेकर यांचा विजय निश्‍चित आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019: Nana Patole in Sakoli - Fighting in the Fukane