Election Results 2019 : बुलडाण्यात तीन विद्यमान आमदार पराभवाच्या छायेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सात पैकी पाच मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मेहकरचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांनी सर्वाधिक 48 हजार 601 मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड, खामगावात भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर आहेत. 

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सातही मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात तीन विद्यमान आमदार पराभवाच्या छायेत दिसून येत आहे. यामध्ये मलकापूर मतदारसंघात उलटफेर होत असल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर असून, कॉंग्रेसचे राजेश एकडे 12 हजार 120 मतांनी आघाडीवर आहेत. सात पैकी पाच मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मेहकरचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांनी सर्वाधिक 48 हजार 601 मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड, खामगावात भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर आहेत. 
सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे व डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यात तर चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले व कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. डॉ. शिंगणे 4211 मतांनी पुढे आहेत. चिखली मतदारसंघात भाजप उमेदवार श्‍वेता महाले यांनी 2144 मतांची आघाडी घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019: Three MLAs in the buldana are in the shadow of defeat