Election Results : गडचिरोली-चिमूरमध्ये कमळ फुलले

अशोक नेते
अशोक नेते

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भाजपचे अशोक नेते यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी याचा 76 हजार 883 मतांनी पराभव केला तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना 1 लाख 9 हजार 491 मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर असून 24 हजार
213 मतदारांनी नोटाला पसंती दिली. बसपचे हरिचंद्र मगाम यांना 27 हजार 807 तसेच आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना 15 हजार 913 मते मिळाली.
गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर गुरुवारी (ता.23) सकाळी मतमोजणीला सुरवात झाली. भाजपचे अशोक नेते यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेश गजबे यांनी एक लाखाच्या वर मते घेतल्याने त्याचा फटका डॉ. उसेंडी यांना बसला. दुपारपर्यंत 50 हजारांची लीड मिळाल्यानंतर भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com