'निवडणुकीचा परिणाम अर्थसंकल्पावर नाही'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नागपूर - पाच राज्यांतील निवडणुकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे; मात्र या राज्यांच्या निवडणुकीचा अर्थसंकल्पावर कुठलाही परिणाम होणार नसून, निश्‍चित तारखेलाच अर्थसंकल्पाचे सादरीकरण होईल, असा विश्‍वास केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी (ता. 6) व्यक्त केला.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) 70व्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा उद्‌घाटन सोहळा अकादमी परिसरात झाला. त्या वेळी गंगवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच (1 एप्रिल) विविध योजनांना निधी मिळावा, यासाठी पंतप्रधानांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या या निर्णयाला मित्रपक्ष शिवसेनेसह इतर पक्षांनी विरोध दर्शविला. या पार्श्‍वभूमीवर गंगवार यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करत अर्थसंकल्प निश्‍चित तारखेलाच होईल, असे स्पष्ट केले. नोटाबंदीच्या परिणामांवर प्रकाश टाकताना करदात्यांचे प्रमाण वाढणार असल्याचे गंगवार म्हणाले.

Web Title: The election results do not budget