Election Results : रामटेकमधून कृपाल तुमाने विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला.
सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच तुमाने यांनी आघाडी मिळविली होती. ती अखेरच्या फेरीत 90 हजारापर्यंत पोहचली. मतमोजणीदरम्यान किशोर गजभिये यांनी तब्बल 40 आक्षेप नोंदविले. यात प्रामुख्याने उमरेड विधानसभा मतदारसंघातील एका ईव्हीएमची बॅटरी बंद असून दुसऱ्या एका मशीनमध्ये दोन सी.यू. नंबर दाखवत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, उमरेड येथील स्टॉंग रुमचे डीव्हीआर चोरीला गेले होते. याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून गजभिये यांनी उमरेडमध्ये फेरमतदान करण्याची मागणी केली आहे. याशिवाय पहिल्या फेरीत 10 ईव्हीएम मशीन खराब निघाल्यात. त्यावर कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांनी आक्षेप नोंदविला.
दहाव्या फेरीनंतर 52 हजारांची आघाडी मिळविल्यावर भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी विजय निश्‍चित झाल्याचे मत व्यक्त करीत आनंद साजरा केला. जिल्हा मतदान अधिकाऱ्यांनी 14 व्या फेरीची अधिकृत माहिती जारी केली आहे. यावेळी कृपाल तुमाने 70 हजार 933 मतांनी आघाडीवर होते. त्यांना कृपाल तुमाने 3 लाख 97 हजार 772, कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांना 3 लाख 26 हजार 739, बसपचे सुभाष गजभिये यांना 30 हजार 806 तर वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे-पाटणकर यांना 25 हजार 52 मते मिळाली होती. नोटाला तब्बल 10 हजार 282 मते पडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results: Kripal Tumane won the Ramtek seat