इलेक्‍ट्रिक बसने विकसाला मिळेल चालना

file photo
file photo

नागपूर : पर्यावरणपूरक आणि सार्वजनिक वाहतुकीला सबळ करण्याच्या दृष्टीने खास महिलांसाठी सुरू होत असलेली इलेक्‍ट्रिक बस म्हणजे नागपूरच्या विकासात होत असलेली क्रांती आहे. याकरिता सुरू केले जाणारे इलेक्‍ट्रिक बस चार्जिंग स्टेशन विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
पूर्व नागपुरातील हरिहर मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक बस चार्जिंग स्टेशनच्या भूमिपूजन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे आदी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, खास महिलांसाठी सुरू केलेली "तेजस्विनी' बस लवकरच नागपूरकर महिलांच्या सेवेत दाखल होणार आहे. अशा प्रकारची विदर्भातील ही पहिली बससेवा राहील. खास महिलांसाठी सुरू होत असलेल्या या बसच्या चालक व वाहक महिलाच असाव्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सभापती बंटी कुकडे यांनी आपली बस सेवेतील "तेजस्विनी' बस सेवा म्हणजे क्रांती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com