विजेच्‍या धक्‍क्‍याने पती-पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

सावनेर - पती गॅलरीत कपडे वाळायला घालत असताना गॅलरीपुढून गेलेल्या ११ हजार केव्हीच्या लाइनने ओढले. वाचविण्याकरिता गेलेल्या पत्नीचाही पतीसह भाजून मृत्यू झाला. ही घटना सावनेर शिवाजी चौकातील नाईक ले-आउट येथे रविवारी (ता.८) दुपारी दोनच्या सुमारास घडली. गजानन गवळी (वय ४५), दीपाली गवळी (वय ४०) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सावनेरच्या शिवाजी चौकजवळील नाईक ले-आउट येथे निळकंठ मोहत्कार यांच्या घरी गजानन गवळी हे अनेक वर्षांपासून किरायाने राहात होते. त्यांच्या घराच्या गॅलरीजवळून ११ हजार केव्हीच्या वीजतारा गेल्या आहेत. पावसाळ्यात कपडे वाळत नसल्याने घराच्या छतावर असलेल्या लोखंडी पाइपवरून खालच्या गॅलरीत ओढून पलटवित असताना गॅलरीपुढून गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीने ओढल्याने गजानन गवळी हे जागीच ठार झाले, तर त्यांना वाचवायला गेलेल्या पत्नीने त्यांना पकडल्याने तिचाही भाजून जागीच मृत्यू झाला.

गवळी हे रेमण्ड कंपनीत नोकरीवर होते. पत्नी ओमसाई पब्लिक स्कूलमध्ये शिक्षका होत्या.  त्यांना चार वर्षांचा नैतिक हा मुलगा ओमसाई पब्लिक स्कूलमध्ये केजीवनमध्ये शिकत आहे. तो शेजारच्या घरी खेळत असल्याने तोही थोडक्‍यात बचावला.

पूर्वसूचना म्हणून केला होता अर्ज
घरमालक निळकंठ मोहतकार यांनी वारंवार वीज वितरणाला अर्ज करून घरासमोरील गॅलरीला लागून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर पाइपचे आवरण लावण्याची विनंती केली होती. दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदार असेल, असेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे घडलेल्या घटनेस संबंधित विभाग जबाबदार असल्याचे मोहतकार यांनी सांगितले.

मोहल्यातील ही तिसरी घटना आहे. काही वर्षापूर्वी ईश्वर निमकर यांच्या घरी काम सुरू असताना या विद्युत तारांचा करंट लागू एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोन वर्षांआधी उच्च दाबाच्या तारा शॉट होऊन ताराखाली बसलेल्या महिलेच्या बाजूला पडल्या. परंतु, महिला थोडक्‍यात बचावली होती.

Web Title: Electric shock the husband-wife death

टॅग्स