गवत कापण्याकरिता गेलेल्या मजूर महिलेला विजेचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : खरबी पॉवर स्टेशनमध्ये गवत कापण्याकरिता गेलेल्या एका मजूर महिलेला जबर विद्युत धक्का बसला. या घटनेत मजूर महिला गंभीररीत्या भाजल्या गेली. गंभीर अवस्थेत महिलेला जगनाडे चौक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माधुरी विजय पितलगुंडे (37, रा. साईबाबानगर, खरबी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, माधुरी पितलगुंडे ही महिला सफाई कामगार आहे. महिलेचे साईबाबानगर येथे राहणारे भाचे नितीन केशवराव भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दीड वर्षापूर्वी पितलगुंडे या पॉवर स्टेशनमध्ये मजुरीवर जात होत्या. कार्यालयाच्या स्वच्छतेचे त्यांच्याकडे काम होते. त्यांच्याकडून पॉवर स्टेशनच्या आतील भागातील गवत काढायचे काम त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले होते. रविवारी दुपारी माधुरी या पॉवर स्टेशनमध्ये गवत काढायला गेल्या. दरम्यान, येथे उघड्या स्वरूपात असलेल्या एका केबल वायरला तिचा स्पर्श झाला. स्पर्श होताच संपूर्ण पॉवर स्टेशनमध्ये स्फोट झाल्यासारखा आवाज आवाज आला. त्यामुळे परिसरातील नागरिक आवाजाच्या दिशेने धावून गेले असता माधुरी या गंभीर स्वरूपात भाजलेल्या स्थितीत पॉवर स्टेशनच्या आत पडून होत्या. येथील अन्य कर्मचाऱ्यांनी लगेच महिलेला जगनाडे चौक स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल केले. माधुरीची प्रकृती चिंताजनक असून त्या 85 टक्‍के भाजल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात घटनेची नोंद घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric shock to the working woman