वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइन सेवा निःशुल्क

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

अकोला - ग्राहकांना वीज बिलाचा भरणा ग्राहकांना ऑनलाइनद्वारे सुलभतेने करता यावा यासाठी क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने भरणा केल्यास अशा ग्राहकांना ही सेवा महावितरणने निःशुल्क केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारे ग्राहक वीजबिल ऑनलाइन भरू शकतात. ऑनलाइन भरणा करताना केवळ क्रेडिटकार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल.

Web Title: electricity bill online service