शाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक आकारणी घरगुती दराने (DLF) करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी.बरडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री व शालेय शिक्षणमंत्र्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदने नोंदणीकृत डाकेद्वारा पाठविण्यात आली आहेत. 
या सर्व शाळांची वीज देयक आकारणी व्यवसायिक, व्यापारी दराने करण्यात येत आहे. परंतु शाळा हा व्यवसाय, व्यापार नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली सोय आहे. त्याही पलिकडे जाऊन ती सेवा आहे असे विमाशिचे अध्यक्ष बरडे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

शासनाकडून मिळणारे वेतनेतर अनुदान तुटपुंजे असल्याने या शाळांना व्यवसायिक/व्यापारी दराने वीज देयकाचा भरणा करणे शक्य होत नाही. परिणामी शाळांमध्ये पंखे, लाईट, कॉम्पुटर सुरु ठेवणे राज्यातील अनेक शाळांना शक्य होत नाही. त्यामुळे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होत नाहीत, असेही या निवेदनात नमूद आहे. निवेदनाच्या प्रती शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Web Title: Electricity charges for schools should be charged at domestic rates