वीज कामगार 24 तासांच्या संपावर

वीज कामगार 24 तासांच्या संपावर

यवतमाळ : नऊ मागण्याच्या प्रलबिंत मागण्यासाठी आज (ता. 7) तीनही वीज कंपनीतील कर्मचारी, अभियंत्यांनी मध्यरात्रीपासून 24 तासाचा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. 

संपाच्या अनुषंगाने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 26 डिसेंबरला द्वारसभा घेण्यात आली. एक जानेवारीला काळ्या फिती आणि तीन जानेवारीला लोकप्रतिनिधींना देण्यात आले. प्रशासनाने दोन तारखेला चार ठिकाणी खासगी कंपन्यांना ऑर्डर काढल्यानंतर कृती समिती द्वारे आधी आदेश रद्द करण्यात आले. यानंतर कामगार आयुक्तांनी कामगार आणि प्रशासन यांच्यात समेट घडवण्यासाठी 5 जानेवारीला संयुक्त मिटिंग घेतली. त्यात विशेष निर्णय  झाला नाही. दुसरी बैठक सात तारखेला घेण्याची ठरले. त्यामुळे संप कायम राहिला. 7 तारखेपासून मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली.

आपल्या अस्तित्वावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लढण्याची तयारी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने घेतली आहे. आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेट्रिकल वर्कर्स फेडरेशन, सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज संघटना काँग्रेस (इंटक), वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन संघटनांचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com