इंजिनचालकाच्या दक्षतेने होतेय विजेची बचत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

१३ हजार १४८ युनिट वाचवले - विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून गौरव

नागपूर - कर्तव्यदक्ष इंजिनचालकाने कुशलतेने रेल्वेगाडी चालवून महिनाभरात तब्बल १३ हजार १४८ युनिट विजेची बचत केली. या कार्याची दखल घेत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी कर्मचाऱ्याचा गौरव केला. 

१३ हजार १४८ युनिट वाचवले - विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून गौरव

नागपूर - कर्तव्यदक्ष इंजिनचालकाने कुशलतेने रेल्वेगाडी चालवून महिनाभरात तब्बल १३ हजार १४८ युनिट विजेची बचत केली. या कार्याची दखल घेत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी कर्मचाऱ्याचा गौरव केला. 

एस. एल. दीक्षितलू असे वीजबजतीत अग्रेसर राहिलेल्या इंजिनचालकाचे नाव असून, ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत आहेत. रेल्वेने ऊर्जा बचतीवर भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक पद्धतीच्या इंजिनची मदत घेण्यात येत आहे. रेल्वेगाडीला योग्यवेळी ब्रेक लावल्यास रूळ आणि चाकांमध्ये घर्षण होऊन ऊर्जानिर्मिती होते. ही वीज थेट वरून असलेल्या वीजवाहिनीत जाते. इंजिन चालविण्यासाठी वापरली जाणारी आणि घर्षण पद्धतीने तयार झालेल्या विजेची नोंदणी इंजिनमधील मीटरमध्ये नोंदविली जाते. दीक्षितालू यांनी जानेवारी महिन्यात तब्बल १३ हजार १४८ युनिट विजेची बचत केली. म्हणजेच त्यांनी घर्षणातून वीजनिर्मिती करून अन्य गाड्यांच्या वापरात येईल एवढी वीज उपलब्ध करून दिली. दीक्षितलू यांच्यासह अन्य एका कर्मचाऱ्याला वैयक्तिक आणि चार कर्मचाऱ्यांना सामूहिक पुरस्काराने गौरविण्यात आले. तांत्रिक दोषामुळे बल्लारशाह येथे मालगाडी बंद पडली. इंजिन चालकाकडून सूचना मिळताच मुख्य इंजिन निरीक्षक करीमुल्लाह हक यांनी तातडीने घटनास्थळ गाठून अल्पावधीत गाडी दुरुस्त केली. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. शिवाय इंजिनचालक अभय मानकर, सहायक लोको पायलट सुनील कुमार सिंह तसेच इंजिनचालक उज्ज्वल कुमार आणि सहायक प्रकाश के. यांच्या दक्षतेमुळे रेल्वे अपघात टाळणे शक्‍य झाले. 

या सर्व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Web Title: electricity saving by engine driver