Maharashtra vidhansabha 2019 इलेक्‍ट्रॉनिक्‍स निवडणूक चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर  : सीसीटीव्ही, पेनड्राइव्ह, कॅमेरा ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांची यादी नव्हे तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नवीन निवडणूक चिन्हे आहेत. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अन्य नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवरांसाठी वाटप करण्यात येणारी चिन्हे आयोगाने जाहीर केली. या मुक्त चिन्हांमध्ये वाढ केली आहे. त्यात हिरवी मिरची, सफरचंद, नारळ याचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने 197 मुक्त चिन्हे जाहीर केली. त्यात हिरवी मिरची, पेनड्राइव्ह, ऑटो, कुकर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत कोट आणि सिलिंडरचाही समावेश आहे. निवडणुकीत निवडणूक चिन्हाला अतिशय महत्त्व असते. या चिन्हाद्वारेच उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचणे सोपे जाते. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह ठरलेले आहे. परंतु, लहान-लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी मात्र निवडणूक आयोगातर्फे चिन्हाचे वाटप केले जाते. यासाठी निवडणूक आयोगाने मुक्त निवडणूक चिन्हे जारी केले आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर चिन्ह वितरित केले जातील. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक मुक्त चिन्हांमध्ये 197 मुक्त चिन्हांचा समावेश आहे. यात एअर कंडीशनर, दुर्बीण, कॅन, बिस्कीट, कपाट, सफरचंद, नारळाची बाग, कॅमेरा, ड्रील मशीन, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, गॅस शिगडी, भेटवस्तू, खाट, सेफ्टी पीन, विहीर, भालाफेक, लिफाफा, चिमटा, जहाज, झोपाळा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, फणस, ग्रामोफोन, आइस्क्रीम, पॉकीट, ट्रक, चावी, चप्पल, बॅटरी टॉर्च, गॅस शेगडी आदी चिन्हांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electronics Election Symbols