शेवटी बिथरलेला "गणेश' जेरबंद 

शेवटी बिथरलेला "गणेश' जेरबंद 

चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील सर्वाधिक वाघ येथे पाहायला मिळातात. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची पर्यटनासाठी येथे गर्दी होत असते. काही दिवसांपूर्वी भद्रावतीतील नदीच्या कपारीत वाघ फसल्याची घटना घडली होती. वाघाला वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, कपारीतून पळून गेलेल्या वाघाचा दुसऱ्यादिवशी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प शनिवारपासून आणखी चर्चेत आला आहे. 

ताडोबा अभयारण्याच्या मोहुर्ली प्रवेशद्वारातून काही वर्षांपासून पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपासून ही सफारी काही कारणास्तव बंद करण्यात आली. त्यामुळे सफारीसाठी उपयोगात आणणारे चार हत्तींची या प्रवेशद्वारा शेजारी राहण्याची व्यवस्था वनविभागाने केली आहे. यातीलच एक गणेश नामक हत्ती. जानकीराम हा गणेशचा काळजीवाहू आणि माहुत म्हणून काम करीत होता. 

शनिवारी सकाळपासूनच गणेश विचित्र वागत होता. शंकर नामक कर्मऱ्याला गणेशने जखमी केले. शंकरला जानकीराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. त्यानंतर तो घरी परतला. तेव्हा गणेश पुन्हा नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती मिळाली. तो लगेच तिथे पोहोचला. गणेशला आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न जानकीरामने सुरू केले. मात्र, गणेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

चिडून जाऊन गणेशने जानकीरामलाच चिरडून टाकले. यात जानकीराम ठार झाला. यावेळी वनकर्मचारी आणि पर्यटक तिथे उपस्थित होते. परंतु, जानकीरामच्या मदतील कुणी पुढे येऊन शकले नाही. तब्बल दोन तास मृतदेह हत्तीसमोरच पडून होता. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गणेशला जंगलात पिटाळून लावण्याचे प्रयत्न सुरू केले. बऱ्याच प्रयत्नानंतर गणेशाला जंगलात पिटाळून लावण्यात यश आले. त्यानंतर जानकरीमचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तेव्हापासूनच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गणेशवर लक्ष ठेवून होते. 

हार्ट मारून केले बेशुद्ध 
रविवारी (ता. 17) वनविभागाची चमू गणेशच्या मागावर होती. त्यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडेही होती. पहाटेच्या सुमारास बिथरलेल्या हत्तीला जेरबंद करण्यात यश आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट मारून गणेशला बेशुद्ध केले. त्यानंतर हत्तीला साखळबंद करण्यात आले असून, त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com