esakal | कोरोना अपडेट : यवतमाळ पाठोपाठ अमरावतीत आढळले इतके रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Eleven patients reported positive in Amravati on Tuesday morning

विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. नागपुरात तर हजाराचा आकडा पार केला आहे. अशीच स्थिती अकोला जिल्ह्याचीही आहे. अकोल्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत नागपुरात मात्र मृत बाधितांचा आकडा कमी आहे. असे असले तरी चिंता काही कमी नाही.

कोरोना अपडेट : यवतमाळ पाठोपाठ अमरावतीत आढळले इतके रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विदर्भासाठी सोमवारचा दिवस चांगली बातमी घेऊन आला नाही. यवतमाळ जिल्ह्यात तीन तर नागपुरात एक असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अशात मंगळवारी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी अकरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे अमरावतीत बाधितांची संख्या 359 वर पोहोचली आहे. 

विदर्भात नागपूर व अकोला कोरोना रुग्णांमध्ये आघाडीवर आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुगण आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. असे असताना अमरावती जिल्हा या दोन जिल्ह्यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसून येते. अमरावतीत रुग्ण वाढत असल्याने बाधितांचा आकडा 359 वर पोहोचला आहे. मंगळवारी अकरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स

बाधितांमध्ये जुनी वस्ती बडनेरा येथील दोन पुरुष व एक महिला, यशोदानगर येथील पुरुष, जयस्तंभ चौक येथील दोन पुरुष, कंपास पुरा, बडनेरा येथील पुरुष, पठाण चौक येथील पुरुष, टाकरखेडा शंभू येथील पुरुष, सराफा, सक्करसाथ येथील पुरुष, चांदूर बाजार येथील पुरुष यांचा समावेश आहे. 

विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. नागपुरात तर हजाराचा आकडा पार केला आहे. अशीच स्थिती अकोला जिल्ह्याचीही आहे. अकोल्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत नागपुरात मात्र मृत बाधितांचा आकडा कमी आहे. असे असले तरी चिंता काही कमी नाही. अमरावतीतही दररोज सात ते आठ रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काही संपलेली नाही. अनेक उपाययोजन सुरू असतानाही रुग्ण वाढत असल्याने ताण कायमच आहे. 

loading image