आज अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी प्रकाशित, तीन महिन्यानंतर होणार प्रवेशाला सुरुवात

eleventh class  second list publish today in nagpur
eleventh class second list publish today in nagpur

नागपूर : मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या निर्णयानंतर अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. नागपुरात ५९ हजार १७० जागांपैकी १३ हजार ४५४ जागांवर प्रवेश देण्यात आले असून अद्याप ४५ हजार १७६ जागा रिक्त आहेत. दुसऱ्या फेरीसाठी २८ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी निश्चित केली असून शनिवार ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर मोबाईलवर प्रवेशाचे संदेश पाठवण्यात आले आहेत. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेत शहरातील २१६ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आली. यात अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता आला. ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीताल १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेशास तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली. तब्बल दोन महिने प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता. मात्र, पुन्हा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत एकूण ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३४ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविला आहे. आज विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली असून प्रवेशास सुरुवात करण्यात येणार आहे.

जागांची संख्या - 

  • कला - ९,६६० 
  • वाणिज्य - १७,९२० 
  • विज्ञान - २७,३३० 
  • एमसीव्हीसी - ४,१३० 
  • चौकट
     
  • ५ डिसेंबर - गुणवत्ता यादी प्रकाशित करणे.
  • ५ ते ९ डिसेंबर - महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करणे.
  • १० डिसेंबर - नियमित फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रकाशित करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com