आपात्कालीन स्थितीत आहात, 'नो टेन्शन'! जस्ट डायल ‘112'

विवेक मेतकर
मंगळवार, 27 मार्च 2018

आपत्कालीन स्थिती आहे, संकाट सापडला आहात, नोटेन्शन! जस्ट डायल ‘११२’. आपत्कालीन स्थितीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन व अन्य सुविधांसाठी आता वेगवेगळे क्रमांक डायल करण्याची गरज नाही. त्यामुळे वेगवेगळे नंबर लक्षात ठेऊन ते डायल करण्यातून उडणाऱ्या गोंधळाला पूर्णविराम मिळून, विनाविलंब यांसारख्या सेवा आपत्कालीन स्थितीत उपलब्ध होऊ शकेल.

अकोला : आपत्कालीन स्थिती आहे, संकाट सापडला आहात, नोटेन्शन! जस्ट डायल ‘११२’. आपत्कालीन स्थितीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन व अन्य सुविधांसाठी आता वेगवेगळे क्रमांक डायल करण्याची गरज नाही. त्यामुळे वेगवेगळे नंबर लक्षात ठेऊन ते डायल करण्यातून उडणाऱ्या गोंधळाला पूर्णविराम मिळून, विनाविलंब यांसारख्या सेवा आपत्कालीन स्थितीत उपलब्ध होऊ शकेल.

अमेरिकेत ९११ क्रमांक फिरवल्यानंतर या सेवा मिळतात. त्याच धर्तीवर भारतात ११२ क्रमांक फिरवून या सेवा मिळवता येतील. आतापर्यंत आपत्कालीन सेवांसाठी १००, १०१, १०२ व १०८ असे वेगवेगळे क्रमांक हेल्पलाइन म्हणून उपयोगात होते; ही सर्व क्रमांक लक्षात ठेवणे म्हणजे डोकेदुखीच, त्यात वेळेवर ती आठवली तर बरी. नाही तर पोलिसांचा फोन, रुग्णवाहिकेला आणि रुग्णवाहिकेचा फोन अग्निशमन विभागात, असा गोंधळ उडालाच म्हणून समजा. या सर्व गोंधळाला ब्रेक लावत आता ११२ क्रमांक हा एकच पर्याय उलब्ध करून देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन सिद्धी उद्‍भवू द्या, एक क्रमांक डायल केला तरी संदर्भानुसार विनाविलंब ती सेवा मिळू शकेल.

‘आऊटगोइंग बंद, नोटेन्शन’

आधीचे १००, १०१, १०२, १०८ हे क्रमांक कायम राहतील, पण ते दुय्यम असतील. जर या क्रमांकावर फोन केलात तर तो ११२ या दूरध्वनीक्रमांकाला वळवला जाईल. लँडलाइन व मोबाइलवरून हा फोन करता येईल. आउटगोइंग बंद किंवा फोन सेवा तात्पुरती बंद असेल तरी नोटेन्शन. ११२ हा क्रमांक आपत्कालीन स्थितीत डायल करता येईल. या क्रमांकावर ‘एसएमएस’ केला तरी संदर्भ सेवा उपलब्ध होऊ शकेल. एसएमएस पाठविणाऱ्या व्यक्तीचे स्थळ संबंधित सेवापुरवठादारांना एसएमएसोबतच माहित होणार असल्याने स्वतंत्रपणे आपत्कालीन सेवा पुरविण्यासाठी पत्ता शोधण्याची गरज भासणार नाही.

जीपीएस गरजेचे

पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन बंब व रुग्णवाहिका यांना जीपीएस लावणे बंधनकारक करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षा केंद्रातून (पीएसएपी) उत्तरे देताना इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेत उत्तरे देण्याची सोय करावी असेही सूचवण्यात आले आहे. त्यासाठी प्रादेशिक डाटाबेस प्रत्येक महानगरात तयार केला जात आहे. त्यात देशभरातील दूरसंचार सेवापुरवठादारांची यादी असणार आहे. गोपनीय माहितीसाठी बीएसएनएल जबाबदार असेल व माहितीची गुप्तता त्यांना पाळावी लागणार आहे. माहिती केंद्र (डाटा सेंटर) स्थापन करण्याचे काम बीएसएनएलला दिले असून त्यात सेवा वापरणाऱ्यांची सूची सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून घेतली जाईल, ती वेळोवेळी सुधारली जाईल पण ती माहिती गुप्त राहील.

सेवेसाठी वाहनांचा ताफा

या सेवेसाठी पुणे आणि नागपूर येथे मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे. डायल ११२ साठी ग्रामीण भागात १०४८ तर शहरी भागात ४५४ चारचाकी वाहनांची गरज भासणार आहे. ग्रामीण भागात २०२१ दुचाकी आणि शहरी भागात २४१ दुचाकी वाहने ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Web Title: Emergency Condition No tension Dial 112