अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचे हाल, अमरावती भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम

employees of amravati land records office strike continues
employees of amravati land records office strike continues

अमरावती : सर्वसामान्यांशी निगडित जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूमिअभिलेख कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने या महत्त्वाच्या विभागात कामे घेऊन येणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विशेष म्हणजे यामध्ये माघार घेण्यास कुणीही तयार नाही. कासवगतीने कामकाज असणाऱ्या या कार्यालयात आठ दिवसांत फायलींचे ढीग जमा झालेले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका महिन्यापूर्वी नागपूरवरून बदली होऊन आलेले उपअधीक्षक अनिल फुलझेले यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, असे आरोप करीत कर्मचाऱ्यांनी 22 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले. वास्तविक या कार्यालयात शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचीच कामे प्रलंबित आहेत.

संपूर्ण कार्यालयात सन्नाटा पसरला आहे. उपअधीक्षकांसह दोन ते तीनच कर्मचारी कामावर आहेत. पर्यायाने फेरफार, नोंदी तसेच भूमिअभिलेखाशी संबंधित संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. सर्वसामांन्यांना आपल्या कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, या आंदोलनामुळे त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी रेटून धरली आहे. तसे फलकसुद्धा कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहे. दुसरीकडे सर्वसामांन्यांचा मात्र कुणीच वाली नसल्याचा प्रत्यय सामान्यांना येत आहे.

या कार्यालयातील अनागोंदी संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तीन दिवसांत निकाली निघणारे नकाशे, फेरफार यांना एक-एक महिना लावण्यात येत आहे. अनेक प्रकरणे तर मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर काय गुन्हा केला, असे भूमिअभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक अनिल फुलझेले म्हणाले.

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com