‘आता रोजगारनिर्मिती आणि ग्रामविकास’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर - लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांचे शनिवारी प्रथमच शहरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ‘भक्ती’ बंगल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लघुउद्योग खात्यात खादी ग्रामोद्योग, हॅंडलूम, स्टार्टअप, स्टॅंडअपसह छोट्यामोठ्या उद्योगांचा समावेश होतो. ग्रामीण भागाचा विकास व रोजगारनिर्मिती करण्याचे आधीच ठरविले होते. त्यात संबंधित खातेही मिळाले आहे. सध्या खादीच्या कपड्यांची मोठी क्रेझ आहे. देश-विदेशातही मागणी आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्राच्या दृष्टीने रस्ते व सिंचन ही खाती महत्त्वाची आहेत. पाच वर्षांत १७० पूल कम बंधारे बांधले आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment Generation and Rural Development Nitin Gadkari