रोहयोच्या कामावरील युवतीचा उष्माघाताने मृत्यू

रोजगार हमी योजनेचे काम करीत असताना एका युवतीचा अचानक उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सुमारास कोरची तालुक्यातील भिमपूर येथे घडली.
sunstroke
sunstroke sakal
Summary

रोजगार हमी योजनेचे काम करीत असताना एका युवतीचा अचानक उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सुमारास कोरची तालुक्यातील भिमपूर येथे घडली.

गडचिरोली - रोजगार हमी योजनेचे काम करीत असताना एका युवतीचा अचानक उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील भिमपूर येथे घडली. सुनीता सुंदर पुळो (वय २४) रा. नवरगाव, असे मृत तरुणीचे नाव आहे.

कोरची येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत भिमपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत नाला सरळीकरणाचे काम २७ मेपासून सुरू आहे. गुरुवारी या कामाचा शेवटचा दिवस होता. अनेक पुरुष आणि महिला मजूर सकाळी ७ वाजताच कामावर गेले होते. त्यात सुनीता पुडो हिचादेखीत समावेश होता. काम करीत असताना सुनीताला अचानक भोवळ आली. लगेच तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुणे यांनी तिला मृत घोषित केले. सुनीताचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे डॉ. खुणे यांनी सांगितले. जिल्ह्यात उष्माघाताचा पहिलाच बळी असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सरपंच कौशल्या काटेंगे, के. बी. वासनिक, रोजगारसेवक श्यामराव अंबादे उपस्थित होते. मृत सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंब भूमिहीन असल्याने मजुरी करूनच घरचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यामुळे शासनाने सुनीताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com